यलो अलर्ट! राज्यात 'या' ७ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा ; वाचा सविस्तर
यलो अलर्ट! राज्यात 'या' ७ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
राज्यातील अनेक भागात हवामान विभागाकडून  पुन्हा एकादा पावसाची शक्यता  वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण , विदर्भ , मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि कल्याणसह सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान अंशतः ढगाळ आहे परंतू उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group