राज्यात २ हजार कोटींचा एसटी घोटाळा उघड ; 'त्या' निणर्याला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती
राज्यात २ हजार कोटींचा एसटी घोटाळा उघड ; 'त्या' निणर्याला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती
img
DB
राज्यात दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. सरकारला अंधारात ठेवून एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आला असून  राज्य परिवहन महामंडळाने 1310 एसटी बस भाडेतत्त्वावर देताना व्यवहारात ठेकेदारावर मेहेरबानी दाखवल्याचं बोललं जात आहे.

भाडेतत्त्वावर बस घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असून या पूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. 

हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या निर्णयामुळे एसटी महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे. 

महायुतीचे नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व विभागांचा कार्यभार होता. याच काळात संबंधित कंपन्यांना इरादा पत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले. मुख्यमंत्र्यांनी महामंडळाच्या कारभारावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचेही सांगण्यात येतंय. 

या संपूर्ण घोटाळ्यात दोन हजार कोटींचे नुकसान होऊ शकते अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्यानंतर भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group