मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. राजकोट किल्ल्यावरील हा भव्य पुतळा पाहून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.दरम्यान, महाराजांचा पुतळा किमान 100 वर्ष कुठल्याही वातावरणात टिकेल, असं मुख्यमंत्र्यांनी अनावरण सोहळ्यानंतर सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अनेक पिढ्यांनी शौर्याची प्रेरणा देईल, असं मत नेत्यांनी व्यक्त केलं. जर वादळं आली, तर त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हा भव्य पुतळा 83 फुटांचा असून महाराजांच्या हातातील तलवारीची लांबी तब्बल 15 फूट इतकी आहे. कास्य धातूपासून पुतळ्याची निर्मिती करण्यात आलीय.
वादळी वाऱ्यांचा कोणताही धोका पुतळ्याला होणार नाही. तर 31 कोटीहून अधिक निधीचा खर्च या पुतळ्यासाठी आलाय.