राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस ;  'या' भागात यलो अलर्ट जारी....
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस ; 'या' भागात यलो अलर्ट जारी....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्याच्या काही भागात पावसानं धुमाकूळ घातचला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आजसाठी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खानदेशातही येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून विदर्भातही पाऊस उघडीप देण्यात शक्यता आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group