हिवाळा ऋतूमध्येही पावसाने राज्यात कमबॅक केले असून वातावरणात चढ उतार निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरीमुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. दरम्यान, आज म्हणजेच 5 डिसेंबर आणि उद्या 6 डिसेंबर रोजी राज्यामध्ये विविध ठिकाणी हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच , उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर पुढील काही दिवसांमध्ये मुंबईतील किमान तापमानात लक्षनीय घट होणार आहे. यामुळे मुंबईतील गारठा हा वाढण्यास सुरुवात होईल. तर कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये ढगाळ आकाश राहील. तर पुढील दोन दिवस अधून मधून हलक्या सरी कोसळण्याची देखील शक्यता आहे. पुणे शहरातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. लातूर, धाराशिव, बीड आणि संभाजीनगर या चार जिल्ह्यांमध्ये विधानसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 6 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहील. तस्सेच, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये ढगाळ आकाशासह काहीसं धुक देखील असेल तर नागपूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.