
२९ जून २०२४
राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, रत्नागिरी, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट. हवामान खात्याने वर्तवला अंदाज.
राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Copyright ©2025 Bhramar