मान्सून आज अरबी समुद्रात दाखल झाला. १ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं देखील हवामान खात्याने सांगितले.

हवामानतज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी मान्सूनबाबत महत्वाचे अपडेट दिले आहेत. होसाळीकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून आज अरबी समुद्रात पोहचला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकरत आहे. मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकता दिसत आहे.'
मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर त्याची पुढची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होईल. ५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. ५ जूनला मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर हळूहळू तो १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.