महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांची यादी
१० मे रोजी खालील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अहिल्यानगर, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली.
११ आणि १२ मे रोजी संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही १२ मेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधी म्हणजे १३ मेच्या आसपास अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे.