राज्यात पुन्हा मुसळधार ! पुढील 24 तासांत ''या'' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पुन्हा मुसळधार ! पुढील 24 तासांत ''या'' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
img
दैनिक भ्रमर
राज्यात सध्या पावसाची उघडझाप सुरु असून पुन्हा एकदा जोरदार पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे . गेले अनेक दिवसांपासून विसावलेल्या पाऊस पूढील २४ तासांत राज्यात मुसळधार बारसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान   पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्‍यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असेल. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या तीनही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळ ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो.

तसेच , मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group