महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
img
DB
पुणे : होळीनंतर राज्यात काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात मोठा बदल झाला. आता परत एकदा पारा चढल्याचे बघायला मिळतंय. काही ठिकाणी तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पार तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसतोय.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. होळीच्या अगोदरच दोनदा हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला. 

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कडकडाटासह पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वारे ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता
  
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार, संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २३°C च्या आसपास असेल. आजही दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळीच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.  

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये पावसाची हजेरी

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पावसाने हजेरी लावली. अकोल्याच्या तापमानाची नोंद काल ४१.४ अंश सेल्सिअस नोंदवली गेली. जळगाव, चंद्रपूर, अमरावतीमध्ये पारा ४० वर पोहोचला होता. परभणी, वाशिम, वर्धा मालेगाव, यवतमाळ धुळे याठिकाणी ३९ अंशावर तापमान गेल्याचे बघायला मिळाले. पुणे येथेही पारा आज वाढण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये काल पारा ३८ अंशावर पोहोचल्याचे बघायला मिळाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group