मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. या पावसाचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक जवळपास 20 मिनिटं उशिराने सुरू आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे. तर अमरावती वर्धा, नागपूर गोंदिगों याला यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय पुढचे दोन दिवस कोकणाला मुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईच्या रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू
आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. तर मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनची वाहतूकही 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. तसेच हार्बर मार्गावरील वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पाणी तुंबल्यामुळे अंधेरी सबवे येथील वाहूतक बंद करण्यात
आली आहे.