महाराष्ट्रात राज्यात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे.जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही राज्याच्या बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील हवामान कसे असेल जाणून घ्या
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भात पुढील पाच दिवस मेघ गर्जना, विजांचा कडकडाट ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर २५ जूनला पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठावाड्यातही पावसाची शक्यता
हवामान विभागाने आज मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज बुलढाणा, अकोला, अमरावती याजिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटसह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याकाळात काही भागात वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागालापावसाचा ऑरेंज अलर्ट जारीकरण्यात आल्याची माहिकी IMD ने दिली आहे.
मुंबई-पुण्यात कसे असेल हवामान?
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याचीशक्यता आहे, त्यामुळे मुंबई आणि परिसराला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे व परिसरातआज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र काही भागात वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.