मान्सूनबाबत आनंदाची बातमी : यंदा  वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार ; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? वाचा
मान्सूनबाबत आनंदाची बातमी : यंदा वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार ; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? वाचा
img
Dipali Ghadwaje
उन्हाळ्याच्या कडाक्यातही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. यामुळे तापमानाचा पारा खाली आल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अंदमान निकोबार बेटावरून मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली. वेळेआधीच मोसमी पाऊस निकोबार बेटांवर दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. केरळमध्ये एक जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्यानं यंदा १०५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. केरळमध्ये १ जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ८ जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे. एल निनोचा प्रभाव नसल्यानं अनुकूल वातावरणामुळे पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरीस मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल.

त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येऊ शकतो. यंदा महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group