राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
img
Dipali Ghadwaje
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आता मान्सूनचं राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे. राज्यात मॉन्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत सध्या घाटकोपर ते मुलुंड दरम्यान पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 4 जून रोजी मोसमी पाऊस गोव्यात दाखल झाला. त्याने पुढची कुच सुरु केली आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तळकोकणात आज पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल. तर 10 जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांसह राज्यात पाऊस मांडव घालेल. शनिवारपासून राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडेल. पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर राहणार आहे.

शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहे. राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मुंबई आणि परिसरात उकाड्याचा त्रास आहे. तर राज्यातही घामांच्या धारांनी नागरिक वैतागले आहेत. पावसाची सर्वांना प्रतिक्षा आहे. पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group