पर्यटकांसाठी महत्वाची बातमी!
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! "या" प्रसिद्ध धबधबा परिसरात एक जूनपासून वाहतूक बंदी
img
Dipali Ghadwaje
पावसाळ्यात गोव्यासह देशभरातील पर्यटकांची पाऊले गोवा आणि कर्नाटक सीमेवरील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या दिशेने वळतात. दरवर्षीय या धबधब्याला भेट देणाऱ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान, गोवा वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यटन विभागाचे उपवनसंरक्षकांच्या वतीने एक जूनपासून दूधसागर धबधबा पर्यटक वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथे हा दूधसागर धबधबा आहे. दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूने चालत जावे लागते. धबधब्याकडे रेल्वेची वेग कमी होतो त्यावेळी काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून खाली उतरतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, मोले येथील दूधसागर धबधबा परिसर वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असेल, असे आदेशात म्हटले आहे. मोले येथील दुधसागर धबधब्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, गेल्यावर्षात येथे पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून सरकारकडून काळजी घेतली जाते. 

तसेच, हा परिसर वन्य प्राण्यासाठी आरक्षित देखील असल्याने भागात पर्यटक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी केव्हा उठवली जाईल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. गेल्यावर्षी देखील ११ जून २०२३ रोजी अशाप्रकारची बंदी घातली होती. त्यानंतर १५ ऑक्टोंबर रोजी ती बंदी उठविण्यात आली होती.

इतर बातम्या
Join Whatsapp Group