जम्मू काश्मीरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ज्यात पर्यटकांनी पर्यटकांनी भरलेली एक टॅक्सी नदीत पडली. या अपघातात चार पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर दोन जण जखमी तर अजून दोन पर्यटक बेपत्ता आहेत. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे, मात्र भीषण अपघाताच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २८ एप्रिल रोजी श्रीनगरमधील सोनमर्गजवळलही भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी सिंध नदीजवळून जात असताना कॅब बर्फाळ रस्त्यावरून घसरली. वाहन घसरल्याने टॅक्सी नियंत्रणाबाहेर जाऊन थेट नदीत पडल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की टॅक्सीमधील पर्यटक वाहून गेले. वाहून गेलेल्या टॅक्सीमध्ये एकूण नऊ पर्यटक होते. टॅक्सी ड्रायव्हर याला किरकोळ दुखापत झाली आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चार पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन जण जखमी झाले तर दोन पर्यटक बेपत्ता आहेत.
सध्या या भागात वाहून गेलेल्या पर्यटकांची नदीत शोधमोहीम सुरु आहे. मात्र अजूनही त्या पर्यटकांचा शोध लागलेला नाही. नदीचा प्रवाह जोरात असल्याने शोधमोहीमेत अनेक अडचणी येत आहेत. सतत सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे आणि पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.