जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, एक जवान शहीद
img
दैनिक भ्रमर
जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये एका जवानाचा मृत्यू झालाय तर एसपीओसह दोन पोलिस जखमी झाले आहेत. .ही चकमक दूदू-बसंतगड आणि डोडाच्या भद्रवाहमधील सोजधार जंगलात सुरु आहे.

उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ३ दहशतवादी लपून बसले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून या परिसरात चकमक सुरू आहे. शनिवारी सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन करण्यात आले. उधमपूर आणि डोडा दोन्ही ठिकाणी ड्रोन, हेलिकॉप्टरद्वारे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. जम्मू-काश्मीर नॅशनल हायवेवर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी ऑपरेशन किश्तवाड सुरू केले गेले आहे. 

जवानांच्या व्हाइट नाइट कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन टीमकडून संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन केले जात आहे. या कारवाई दरम्यान उदमपूरमध्ये लपून बसलेले जैशच्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group