जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ला,
जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ला, "इतक्या" जणांचा मृत्यू!
img
Dipali Ghadwaje
जम्मूतील रियासी भागामध्ये रविवारी भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळं चालकानं नियंत्रण गमावताच बस खोल दरीत कोसळली. अपघात इतक्या भीषण स्वरुपाता होता, की आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे . 

जम्मूमध्ये भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम आता संरक्षण यंत्रणांनी हाती घेतलं आहे. पोलीस, लष्कर आणि CRPFकडून घटनास्थळी आणि या भागाला लागून असणाऱ्या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. भारतीय जवान ड्रोनच्या मदतीनं दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर यापैकी एक दहशतवादी, अबू हमजा हा पाकिस्तानी सैन्यातील माजी सदस्य असल्याचंही सांगण्यात आलं. हमजा आता लष्कर नव्हे, तर दहशतवदी संघटनांसाठी काम करत असल्याची धक्कादायक बाब आतापर्यंतच्या तपासातून समोर आली.

सध्या रियासी येथील दहशतवादी हल्ल्यातील तपासासंदर्भाती पुढील कारवाई आणि तपासाची जबाबदारी NIA वर सोपवण्यात आली असून, NIA चे अधिकारी सोमवारी सकाळीच घटनास्थळी दाखल झाले. या भागात सध्या लष्कराकडूनही शोधमोहिम हाती घेण्यात आली असून, दहशतवाद्यांना कंठस्नानं घालण्यासाठीच यंत्रणा प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group