CRPF जवानानंच केली गद्दारी ;
CRPF जवानानंच केली गद्दारी ; "ही" धक्कादायक माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडून सीआरपीएफ जवान मोती राम जाट याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना संवदेनशील माहिती लीक केल्याचा आरोप जवान मोती राम जाटवर करण्यात आला आहे. २०२३ पासून तो हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले जात आहे.


नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जवान मोती राट हा २०२३ पासून पाकिस्तानी हँडलर्सना राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय माहिती शेअर करत होता. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. गोपनीय माहितीच्या बदल्यात त्याला विविध माध्यमांद्वारे निधी मिळत असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

पाकिस्तानला देशातील संवदेशनील आणि गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी जवान मोती राम जाटला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

सध्या त्याची चौकशी सुरु आहे. पाटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयासमोर त्याला सादर करण्यात आले. न्यायालायने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

ऑपरेशन सिंदूर या भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाली असल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले होते.

त्यानंतर तपास संस्थांनी पाकिस्तानसाठी भारतात हेरगिरी करण्याऱ्या  आरोपाखाली अनेक व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. यात यूट्यूबर ज्योती मल्होत्रा, ज्योती मल्होत्रा, नोमान, देवेंद्र, अरमान यांच्यासह आणखी काहींचा समावेश आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group