सियाचीनमध्ये तैनात महाराष्ट्राच्या अग्निवीराला वीरमरण, अक्षय गवते देशासाठी शहीद
सियाचीनमध्ये तैनात महाराष्ट्राच्या अग्निवीराला वीरमरण, अक्षय गवते देशासाठी शहीद
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते यांना लडाखच्या सियाचिनमध्ये वीरमरण आलं. पिंपळगाव सराई अवघ्या नऊ महिन्यापूर्वीच अग्नीविर म्हणून भारतीय सैन्यदलात रुजू झालेल्या येथील अक्षय लक्ष्मण गवते (२३) यांचा सियाचीनमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. 

दरम्यान त्यांच्या पार्थिवार आज २३ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अग्निवीर असलेल्या अक्षय गवते लाईन ऑफ ड्युटीवर तैनात होते. काराकोरम रेंजमध्ये २० हजार फूट उंचीवर असलेलं सियाचीन जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. 

या ठिकाणी सैनिकांना भीषण थंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करावा लागतो. शत्रू सैन्यापेक्षा इथलं वातावरण सैनिकांची परीक्षा घेतं. मूळचे बुलढाण्याचे असलेले अक्षय गवते देशासाठी शहीद होणारे पहिले अग्निवीर ठरले आहेत. अक्षय गवते यांच्या निधनाबद्दल भारतीय लष्करानं शोक व्यक्त केला. सियाचीनमध्ये अक्षय गवते ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच पिंपळगाव सराईमध्ये शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group