लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याचा भीषण अपघात ; 'इतके' जवान शहीद
लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याचा भीषण अपघात ; 'इतके' जवान शहीद
img
DB
लडाखमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.  श्री नगर- जम्मू आणि काश्मीरच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ T-72 रणगाड्याचा दुर्दैवीअपघात झाला आहे. यात पाच जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील लडाखमधीलदौलत बेग येथे मंदिर मोर येथे हा अपघात झाला आहे.

२०२० मध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या पीएलएमध्ये याच ठिकाणी रक्तरंजित संघर्ष झाला होता.लष्करातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तीनच्या सुमारास आर्मीचा रणगाडा प्रशिक्षणासाठीबाहेर आणण्यात आला होता.  प्रशिक्षणाचा भाग म्हणून रणगाडा पाण्यात उतरवण्यात आला. पण, अचानकनदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि रणगाड्यातील पाच जवानांचा मृत्यू झाला. पाचही जवानांचे मृतदेहसापडले आहेत.



इतर बातम्या
Join Whatsapp Group