तुळजापूरहुन ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे हा अपघात झाला. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज्यभरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच सोलापूरमधून ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. 
नेमकं काय घडलं?
भाविकांनी भरलेले पिकअप स्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पलटी झाले. या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झालेत. प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर बाकीचे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णाकायात दाखल केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.