१३ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू ,नेमकं काय प्रकरण?
१३ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू ,नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
वाशिम : राज्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंगणापूर येथे क्षुल्लक कारणावर एका 30 वर्षीय युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला आहे.  शिंगणापूर येथे क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय युवकाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. या घटनेत युवकाचा मृत्यू झाला असून शिवमंगल भोसले असं मृत व्यक्तीचे नाव आहे. शेतीच्या कामावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

हेही वाचा >>>> नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात

दरम्यान या घटनेत एकूण 13 आरोपी असल्याचं कळते. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना जेरबंद केले आहे.

मृतकाच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपी ताब्यात घेत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पुढील तपास करत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group