नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात
नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात
img
Dipali Ghadwaje
गणेशोत्सवानंतर बघता बघता आजपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक दुर्गा मंडळे देवीच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत तर घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरु आहे. 

आजपासून नऊ दिवस देवीची पूजा, आरती, गरबा असा कार्यक्रम पाहायला मिळणार असून राज्यभरातील नवदुर्गेच्या मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे.

हस्त नक्षत्र आणि इंद्र योगाच्या संयोगात शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. यावेळी नवरात्र ३ ते ११ ऑक्टोबरपर्यंत असून दसरा १२ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. आदिशक्ती नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. या काळात भक्त आपापल्या क्षमतेनुसार उपवास करतात आणि देवीची पूजा करतात.


नक्की वाचा >>>> बदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्येच चालकाकडून 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार
इतर बातम्या
Join Whatsapp Group