बदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्येच चालकाकडून 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार
बदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्येच चालकाकडून 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार
img
Dipali Ghadwaje
बदलापूर येथील शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहे. बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर बस चालकाकडून अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली आहे. इतकंच नाहीतर घडलेल्या घटनेची कुठेही वाच्यता करून नये म्हणून ४५ वर्षीय या बस चालक असलेल्या नराधमाने त्या मुलींना धमकीही दिली होती. 

दरम्यान, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ४५ वर्षांच्या नराधमाविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून हा नराधम आरोपी सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यावर अत्याचार करत होता.

 बस चालक हा दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचं नाही, अशी धमकीही त्या नराधमाने या चिमुकलींना दिली होती.  

नक्की वाचा >>>> मोठी बातमी : प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक ; नेमकं काय आहे प्रकरण?

इतर बातम्या
Join Whatsapp Group