मोठी बातमी ! केंद्र सरकार लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करणार ; अमित शहांची घोषणा
मोठी बातमी ! केंद्र सरकार लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करणार ; अमित शहांची घोषणा
img
Dipali Ghadwaje

देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे.

झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


दरम्यान नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे लडाखच्या लोकांना फायदा होईल. लडाखच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठीच हा निर्णय घेत असल्याचे शहा म्हणाले. गृह मंत्रालयाने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 

नव्या जिल्ह्यांमध्ये झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग यांचा समावेश आहे. हे नवीन जिल्हे प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group