संरक्षण बजेटवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप-10 देशांची यादी, भारत आहे
संरक्षण बजेटवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप-10 देशांची यादी, भारत आहे "या" स्थानावर
img
Dipali Ghadwaje

नवी दिल्ली : जगभरात युद्धाची स्थिती आहे. पश्चिम आशियामध्ये संघर्ष पेटला आहे. त्यामुळे कधीही मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकेल अशी स्थिती आहे. त्यातच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने जगातील देशांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये जगातील कोणते देश लष्करावर किती खर्च करत आहेत याची माहिती देण्यात आली आहे.  रिपोर्टनुसार जगामध्ये सैन्य आणि शस्त्रांवर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे.

२०२३ मध्ये सैन्य आणि शस्त्रास्त्रांवर होणारा खर्च विक्रमी २४४३ अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचला आहे. भारताने लष्करी खर्चामध्ये वाढ केली आहे. लष्करी क्षेत्रावर खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे.  

लष्करी खर्चामध्ये झाली वाढ

रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये भारताने लष्करावर ८३.६ अब्ज डॉलर खर्च केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खर्च ४.२ टक्क्यांनी जास्त आहे. २०२० मध्ये भारताचा चीनसोबत संघर्ष निर्माण झाला होता. तेव्हापासून भारताने आपल्या क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे. चीनला लागून असलेल्या भागात पायाभूत संरचना निर्माण करण्यात आल्या आहेत. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, टँक, तोफा,रॉकेट, मिसाईल आयात आणि निर्मिती करण्यात येत आहेत.

२०२२ मध्ये देखील भारत लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा जगातील चौथा देश होता. त्यावेळी भारताचा लष्करी क्षेत्रावरील खर्च ८१.४ अब्ज डॉलर होता, २०२१ च्या तुलनेमध्ये तो ६ टक्क्यांनी जास्त होता. २०१३ पासून लष्करी क्षेत्रातील खर्चामध्ये ४७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जागतिक स्थिती पाहता आणि चीन-पाकिस्तान यांचा शेजार असल्याने भारताने सर्व दृष्टीने सक्षम असण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनने २०२३ मध्ये आपल्या सैन्यावर २९६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा खर्च ६ टक्के जास्त आहे. २०२२ मध्ये चीनने २९२ अब्ज डॉलर इतका खर्च केला होता. चीनच्या शेजारी असलेल्या अनेक देशांनी लष्करी खर्च वाढवला आहे. यामागचे कारण चीनसोबतचा तणाव हे आहे.

लष्करावर सर्वाधिक खर्च करणारे १० देश 

१. अमेरिका- ९१६ अब्ज डॉलर

२. चीन- २९६ अब्ज डॉलर

३. रशिया- १०९ अब्ज डॉलर

४. भारत - ८४ अब्ज डॉलर

५. सौदी अरेबिया- ७६ अब्ज डॉलर

६. यूके - ७५ अब्ज डॉलर

७. जर्मनी -६७ अब्ज डॉलर

८. युक्रेन - ६५ अब्ज डॉलर

९. फ्रान्स- ६१ अब्ज डॉलर

१०. जपान - ५० अब्ज डॉलर

 

india | army | china |
इतर बातम्या
Join Whatsapp Group