पुणे कार प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन जणांना अटक...
पुणे कार प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन जणांना अटक...
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या  प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोप त्यांंच्यावर आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे रक्त न घेता आईचे रक्त घेऊन मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आशपाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचं नाव आहे.

डॉ.अजय तावरेच्या माध्यमातून श्रीहरी हरनोळ, अतुल कांबळे यांच्यासोबत अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली, रक्ताचे नमुने चुकीचे देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली, आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असा आरोप अटक करण्यात आलेल्या या दोघांवर आहे. त्या दोघांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group