पोलिसांना चकवा देत येरवडा तुरुंगातून कुख्यात गुंड फरार !
पोलिसांना चकवा देत येरवडा तुरुंगातून कुख्यात गुंड फरार !
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्याच्या येरवडा तुरुंगात एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेल्याच समोर आलं आहे. कुख्यात गुंड आशिष जाधव तुरुंगातून पळून गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय आहे.  कुख्यात गुंड आशिष जाधवच्या पळून जाण्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हा उपस्थित केलं जात आहे.  
 
दरम्यान काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळं जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं. 

राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने खळबळं उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group