दुर्दैवी ! रुग्णालयातून बरं होऊन घरी जाताना मृत्यूनं गाठलं , कुठे घडली घटना ?
दुर्दैवी ! रुग्णालयातून बरं होऊन घरी जाताना मृत्यूनं गाठलं , कुठे घडली घटना ?
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यातील विमानतळाच्या परिसरात एका अपघातात दीर भावजयीचा मृत्यू झाला आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना दोघांना मृत्यूनं गाठलं आहे. दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला.  

मिळालेल्या माहितीनुसार , आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52 रा. मापसा, गोवा) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय 66 रा. भैरव नगर, पुणे) असं अपघातात मृत पावलेल्या दीर-भावजय यांची नावं आहेत.

अपघातानंतर दीर आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेश्मा यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group