भरधाव ट्रक रिक्षावर उलटला;  भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू
भरधाव ट्रक रिक्षावर उलटला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू
img
DB
चंद्रपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एकीकडे बाप्पाच्या निरोपाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपासवर घडला आहे.  
 
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास जवळ रिक्षा- आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेला ट्रक थेट रिक्षावर उलटल्याने ही मोठी दुर्घटना घडली. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
 
हा भरधाव ट्रक अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन येत होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट शेजारून निघालेल्या रिक्षावर उलटला. रिक्षामध्ये बसलेल्या चौघांचा चिरडुन मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group