चांदवडजवळ कार- कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
चांदवडजवळ कार- कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
रस्त्ये अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, अशातच नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील नमोकार तिर्थक्षेत्रासमोर कार कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कारमधील मृत युवक हे धुळे जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सर्वजण नाशिककडून धुळ्याकडे चालले होते. अपघातग्रस्तांची ओळख मात्र अद्याप पटली नाही. घटनेची माहिती मिळताच वडणेरभैरव पोलिसांसह, सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. 

या अपघातानंतर काही वेळ महामार्गही ठप्प झाला होता. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळित करण्यात आली आहे. भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group