उत्तराखंडची राजधानी देहारादूनमधील कँट परिसरात सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक तरूण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , ओएनजीसी चौकाजवळ हा अपघात झाला. भरधाव कार आधी एका कंटेनरला आणि नंतर एका झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
तीन तरूणींसह सहा जणांनी या अपघातात जीव गमावला तीन तरूणी आणि तीन तरूणांचा समावेश आहे. गुनीत (वय १९), कुणाल (२३ वर्षे), नव्या (२३ वर्षे), अतुल (२४ वर्षे), कामाक्षी (२० वर्षे), ऋषभ जैन (२४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
नेमकं काय घडले?
कँट परिसरातील ओएनजीसी चौकाजवळ रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. कार आधी एका कंटेनरला धडकली. त्यानंतर ती रस्त्यानजीकच्या झाडावर आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव कार किशननगर चौकाकडून आली होती. ओएनजीसी चौकाजवळ कारचं नियंत्रण सुटलं. भरधाव कारने एका कंटेरनला जोरदार धडक दिली.
जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक या अपघातात सिद्धेश अग्रवाल हा २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तो राजपूर रोड येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कार किशननगर चौकाकडून ओएनजीसी चौकाच्या दिशेने जात होती.
भरधाव असलेली कार ही एका कंटेनरला धडकली. कारचा बोनट हा कंटेनरमध्ये अडकला. त्यानंतर जवळपास १०० मीटरवर असलेल्या एका झाडावर जाऊन ती कार अडकली. परिसरावर शोककळा या भीषण आणि भयावह घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे