मुंबई : मुंबईतील वरळी हिट अँड रनची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा वर्सोवा समुद्रकिनारी सोमवारी आलीशान मोटरगाडीने दोघांना चिरडले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती जखमी झाली आहे.
याप्रकरणी चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनी मद्यसेवन केले होते का याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी पाठवले आहेत.
वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर 'हिट अँड रन' समुद्र किनाऱ्यावर कार चालविण्यास बंदी आहे. तरीदेखील या लोकांनी कार चालवल्याचं समोर आलंय. वर्सोवा पोलिसांनी नंबरप्लेटच्या मदतीने कार चालकासह दोघांना अटक केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार , चालक निखली जावडे यांच्यासह त्याचा मित्र शुभम डोंगरेला अटक करण्यात आलीय. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी पहाटे गणेश यादव ( वय ३६) आणि बबलू श्रीवास्तव ( वय ३६) बीचवर झोपले होते. तेव्हा त्यांना एका अलिशान कारने धडक दिली होती. या धडकेत गणेश यादवचा मृत्यू तर बबलू श्रीवास्तव जखमी झालाय.
गणेश यादव हा ऑटोरिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो, तर बबलू श्रीवास्तव हा डिलीव्हरी बॉयचं काम करतो. ते अधुनमधून वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपायला जात होते. सोमवारी देखील ते नेहमीप्रमाणे झोपायला गेले होते. तेव्हा रात्री झोपेत असताना एक भरधाव कार आली होती, त्यांना धडक देवून जागी झाली.
घटनेनंतर बबलू श्रीवास्तव जागा झाला असता, त्याला शरिरावर जखमा दिसल्या, तर गणेश जखमी अवस्थेत पडलेला होता. कारमधील व्यक्तींनी मात्र घटनास्थळावरून पळ काढला होता.
बेदकारपणे गाडी चालवत दोघांना चिरडलं बबलुने तातडीने गणेशला रूग्णालयात दाखल केलं होतं. परंतु पोलिसांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. सागर कुटीर चौपाटीवर घडलीय. घटनेनंतर जखमी व्यक्तीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. समुद्र किनाऱ्यावर कार चालविण्यास बंदी असूनदेखील या लोकांनी बेदकारपणे गाडी चालवत दोघांना चिरडलंय. त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगात फिरवत दोघांना अटक केलीय. त्यांनी नंबरप्लेटच्या साहाय्याने आरोपींना अटक केल्याचं सांगितलं जातंय.