
१० मे २०२५
रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , पीएमपीएल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. शिक्रापूर- तळेगाव महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री हे तिघे मित्र तळेगाव ढमढेरेकडे जात होते.
त्याचवेळी समोरून येणाऱ्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.
Copyright ©2025 Bhramar