हृदयद्रावक ! २६ वर्षीय IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, गाडीचा टायर फुटल्यानं घडली दुर्घटना
हृदयद्रावक ! २६ वर्षीय IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, गाडीचा टायर फुटल्यानं घडली दुर्घटना
img
Dipali Ghadwaje
मध्य प्रदेशातील एका प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्याचा रविवारी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात त्याच्या पहिल्या पोस्टिंगवर पदभार स्वीकारण्यासाठी जात असताना रस्ते अपघातात  मृत्यू झाला. कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे 26 वर्षीय अधिकारी हर्षबर्धन यांनी नुकतंच म्हैसूर येथील कर्नाटक पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.

अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे हर्षवर्धन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. कर्नाटकमधील हासन जिल्ह्यात हर्षवर्धन यांची पहिली पोस्टिंग झाली होती.

आपला कार्यभार सांभाळण्यासाठी हर्षवर्धन निघाले होते. त्याचवेळी आयपीएस हर्षवर्धन यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. हर्षवर्धन २०२३ कर्नाटक बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे मध्य प्रदेशमधील राहणारे आहे. फक्त २६ व्या वर्षी त्यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आयपीएसचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर या तरुण अधिकाऱ्याच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. हर्षवर्धन यांनी IPS चं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला होता. पहिली पोस्टिंग कर्नाटकमधीव हसन येथे मिळाली, पदभार घेण्यासाठी ते निघाले पण माघारी आलेच नाहीत. रस्ते अपघातामध्ये २६ वर्षीय आयपीएस हर्षवर्धन यांचं अपघाती निधन झाले.

हसन तालुक्यातील किटणेजवळ रविवारी सायंकाळी पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरावर आणि झाडावर आदळले. त्यामध्ये हर्षवर्धन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचं निधन झाले.

हर्षवर्धन होलेनरसीपूरमँध्ये प्रोबेशनरी असिस्टंट पोलिस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळण्यासाठी जात होते. त्यावेळी अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चालक मंजेगौडा किरकोळ जखमी झाला आहे. आयपीएस अधिकाऱ्याने नुकतेच म्हैसूर येथील कर्नाटक पोलिस अकादमीमध्ये चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते, अशी माहिती पोलिासांनी दिली.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group