दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर



दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ आज मोठा स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला.

समोर आलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंगमध्ये असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला, सर्व कार जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, तर या स्फोटामध्ये अनेकज जण जखमी देखील झाले आहेत. जेव्हा स्फोट झाला तेव्हा ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारच्या अगदी जवळ हे व्यक्ती उभे असावेत असा अंदाज आहे.

या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती, ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारचा फक्त सागांडा उरला आहे. दरम्यान या घटनेनंतर आता अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group