राज्यसह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा नवी दिल्लीमध्ये अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर अपघात झाल्याचं समोर आहे. या अपघातमध्ये हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात हेमंत गोडसे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झालं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खासदार हेमंत गोडसे दिल्लीत येत होते. त्यावेळी बी डी मार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारचं नुकसान झालं आहे. सुदैवाने हेमंत गोडसे यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या गाडीचं नुकसान झाल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडले ?
हेमंत गोडसे दिल्लीतील बी डी मार्गावरुन जात होते. ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं नुकसान झालं. सुदैवानं या अपघातामध्ये कुणालाही मोठी दुखापत झाली नाही.