मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चौथी यादी, सात उमेदवारांच्या नावाची घोषणा
मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चौथी यादी, सात उमेदवारांच्या नावाची घोषणा
img
DB

मुंबई :  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने  चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चौथ्या उमेदवार यादीत एकूण सात उमेदवारांचा समावेश आहे महत्त्वाचं म्हणजे काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सात उमदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 


चौथ्या यादीत माण,काटोल, खानापूर,वाई, दौंड, पुसद, सिंदखेडा, या मतदारसंघांचा समावेश आहे.

चौथ्या यादीमधील उमेदवारांची नावं

माण - प्रभाकर घार्गे

काटोल- सलील अनिल देशमुख 

खानापूर- वैभव सदाशिव पाटील

वाई-  अरुणादेवी पिसाळ 

दौंड- रमेश थोरात

पुसद- शरद मेंद

सिंदखेडा- संदीप बेडसे



इतर बातम्या
Join Whatsapp Group