"या" दिवशी नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी):- नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात विविध जलशुद्धीकेंद्रांवर कामे हाती घेतल्याने शनिवारी (दि.३०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनी व मनपा पाणी पुरवठा वितरण विभागामार्फत मनपाचे विविध जलशुध्दीकरण केंद्रांवर विविध बुस्टर पंपींग स्टेशन येथे फ्लोमीटर्स, व्हॉल्व बसविणे आदी कामे हाती घेण्यात आली असून येत्या शनिवारी (दि.३०) संपूर्ण शहराचा पाणी-पुरवठा बंद राहणार असून दुसर्‍या दिवशी रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

शहरातील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील रॉ वॉटर पाइपलाइन पाणी गळती बंद करणे व पाथर्डी फाटा येथील ६०० मि.मी. व्हॉल्व दुरुस्ती करणे, कशिश हॉटेल-जवळील ७०० मि.मी. पाईपलाइनवरील व्हॉल्व लिकेज बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर टाकीच्या पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, स्मार्ट सिटी कंपनी मार्फत वासननगर, राणेनगर, पाथर्डी फाटा येथील पाईपलाइनवर व्हॉल्व बसविणे, नाशिकरोड विभागातील उपनगर, इच्छामणी मंगल कार्यालयाजवळ, संजय गांधीनगर रॉ वॉटर पाइपलाइन लिकेज बंद करणे, पवारवाडी जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी, जेलरोड सिग्नलजवळ लिकेज बंद करणे, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथे एच. टी. पोल शिफ्ट करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे फ्लोमीटर बसविणे, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर, व्हॉल्व बसविणे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, बूस्टर पंपिंग स्टेशन येथे विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, सातपूर विभागातील ९०० मि. मी. फीडर पाइपलाइनवरील जलकुंभावर व्हॉल्व व वॉटर मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्र. ९ मधील कार्बन नाका, संदीप प्लास्टीक वॉल कंपाऊंडलगत शुध्द पाण्याच्या ५०० मि.मी. पीएससी पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, प्रभाग क्र. १० मधील भारत गॅस एजन्सीसमोर अशोकनगर येथे ९०० मि.मी. पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे आदी दुरुस्तीची कामे केली जाणार
आहे.

शनिवारी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत शटडाऊन घेण्याय येणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहरास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group