'इंडिया' आघाडीच्यावतीने 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली' ; 'या' नेत्यांची राहणार उपस्थिती
'इंडिया' आघाडीच्यावतीने 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली' ; 'या' नेत्यांची राहणार उपस्थिती
img
दैनिक भ्रमर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात INDIA आघाडीतील सहभागी पक्षांची आज रॅली होणार आहे. INDIA आघाडीच्या वतीने आज दिल्लीतील रामलीला मैदानावर सेव्ह डेमोक्रेसी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात विरोधी पक्ष एकवटला आहे. हुकूमशाही हटाव, लोकशाही बचाव, असा आजच्या रॅलीचा नारा आहे.

अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांची अटक सोबतच काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवणे या सगळ्या गोष्टींच्या विरोधात ही रॅली आहे. रॅलीला मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासहविरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या पक्ष एकसंध ठेवण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. पण आता 31 मार्चला त्या पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावरून भाषण देऊ शकतात. सुनीता केजरीवाल गेल्या काही दिवसांपासून यावर बोलताना दिसत आहेत. केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांची पक्षाच्या बाबतीत सक्रियता वाढली आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला ; प्रचारा दरम्यान वाहनांची तोडफोड

कोणते नेते रॅलीला उपस्थित राहणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन

आरजेडी नेते तेजस्वी यादव

सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी

सीपीआयचे सरचिटणीस डी राजा

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

द्रमुकचे तिरुची शिवा

टीएमसीचे डेरेक ओब्रायन
इतर बातम्या
Join Whatsapp Group