'या' ज्येष्ठ गायिकेचा भाजपात प्रवेश ; दिल्ली स्थित मुख्यालयात केला पक्ष प्रवेश
'या' ज्येष्ठ गायिकेचा भाजपात प्रवेश ; दिल्ली स्थित मुख्यालयात केला पक्ष प्रवेश
img
दैनिक भ्रमर
नवी दिल्ली : 

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर असताना पौडवाल यांनी भाजपाची सोबत केली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यालयात शनिवारी, दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

पौडवाल भाजपात अशावेळी दाखल झाल्या आहेत, जेव्हा देशात निवडणुकांची रन धुमाळी सुरु आहे. दम्यान, आज निवडणूक आयोग लोकसभा आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा देखील करणार आहे. 

पंतप्रधानांचे देशवासियांना खुले पत्र!

जाणून घ्या अनुराधा पौडवाल यांच्या विषयी ?

अनुराधा पौडवाल या जगप्रसिद्ध गायिका आहेत. ९०व्या दशकात बॉलिवूड तसंच भक्तीगीतांनी त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. त्या ६९ वर्षांच्या आहेत. सन १९६९ मध्ये एस डी बर्मन यांचे असिस्टंट आणि संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचं लग्न झालं होत. त्यांना आदित्य आणि कविता अशी दोन मुलं आहेत. आदित्यचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तसंच १९९१ मध्ये त्यांच्या पतीचं देखील निधन झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group