दिल्लीत होणार 'हा' निर्णय! आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
दिल्लीत होणार 'हा' निर्णय! आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका दिल्ली, मुंबईत गुरुवारी होणार आहेत. त्यानंतर निदान फॉर्म्युल्याबाबतचा गोंधळ दूर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

लोकसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसच्या "या" उमेदवारांची नावे निश्चित?

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीची रखडलेली जागा वाटपाची चर्चा आज (गुरुवारी) दिल्लीत मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तीनवेळा जागा वाटपाची ही बैठक रद्द झाल्यानंतर अखेर बैठकीसाठी गुरुवारचा मुहूर्त निघाला आहे. दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होणाऱ्या या बैठकीला भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. भाजपला २८ ते २९, शिवसेनेला १२ ते १३, राष्ट्रवादीला ६ ते ७ तर मनसेला १ जागा मिळतील अशी चर्चा आहे. भाजप जागा वाढवून घेण्यासाठी आग्रही आहे. 

महाराष्ट्राचा जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे. ४८ जागांच्या वाटपाची घोषणा एकाच वेळी होईल. जागांची मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. शेवटी निवडून येणे हा निकष लक्षात घेऊनच जागा वाटप होईल.

- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
इतर बातम्या
Join Whatsapp Group