'ईडी'ने 'या' मुख्यमंत्र्यांविरोधात सुरू केला नवा खटला
'ईडी'ने 'या' मुख्यमंत्र्यांविरोधात सुरू केला नवा खटला
img
दैनिक भ्रमर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कोर्टाने दिलासा दिली, तर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शनिवारीच त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून दिलासा मिळाला. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर नवा खटला सुरू झाल्याचे आरोप आपने केला आहे. याबाबत आम आदमी पार्टी आज रविवारी पत्रकार परिषद घेणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवीन केस उघडल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. केजरीवाल यांना अटक करणे हा ईडीचा उद्देश असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. याआधीही आम आदमी पक्षाकडून अनेकदा आरोप केले आहेत. ईडी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार काम करत आहे. ईडी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहे.

राज्यातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' ; पावसासह गारपीटीची शक्यता

शनिवार, १६ मार्च रोजी, राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ५,००० रुपयांच्या जामीन जातमुचलक्यावर आणि १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. यापूर्वी केजरीवाल यांना याच प्रकरणात ईडीच्या वतीने हजर राहण्यासाठी आठ वेळा समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते एकदाही हजर झाले नाहीत. कथित मद्य घोटाळा प्रकरणात ते काल पहिल्यांदाच न्यायालयात हजर झाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group