पतीसोबत तलाक, मग...  दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
पतीसोबत तलाक, मग... दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
img
वैष्णवी सांगळे
जैश-ए-मोहम्मद’ आता आयएसआय आणि आयएसआयएस प्रमाणेच महिलांच्या सहभागावर काम करत असल्याचं वास्तव्य समोर आलं आहे.  उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगामार्फत कानपूर येथील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेली डॉक्टर शाहीन सैय्यद हिला पोलिसांनी फरीदाबाद येथे मोठे अंतरराज्यीय दहशतवादी माड्यूलचा भंडाफोड झाल्यानंतर अटक केली. 



2006-07 मध्ये डॉक्टर शाहीन सैय्यद हिची निवड उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगामार्फत कानपूर येथील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक नेमणूक झाली होती. डॉक्टर शाहीन सैय्यदने महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी लग्न केले होते. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

घटस्फोटानंतर शाहीन हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली आणि तेथेच एकटी राहत होती. याचाच फायदा घेऊन तिला कट्टरतावादी बनवण्यात आले. नावी दिल्लीतील कार ब्लास्ट प्रकरणातही शाहीनला आरोपीत करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन सैय्यद पाकिस्तानस्थित हँडलरच्या संपर्कात होती. 

या हँडलरकडून भारतातील महिलांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्याचे निर्देश दिले जात होते. शाहीन सैय्यदचा संबंध नव्याने स्थापन झालेल्या ‘जमात उल मोमिनात’ या संघटनेशी असून, ही संघटना प्रतिबंधित ‘जैश-ए-मोहम्मद’ने गेल्या महिन्यातच सक्रिय केलीय. अधिक चौकशीसाठी शाहिनला श्रीनगर येथे हलविण्यात आले आहे. चौकशीतून आणखी धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group