एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून पोलीस नमुने काढत असताना मोठा स्फोट झालाय, ज्यात ९ जणांचा मृत्यू झालाय.
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. जप्त केलेले अमोनियम नायट्रेट नौगाम पोलीस स्टेशनच्या आवारात साठवले होते, ज्याची फॉरेन्सिक टीम चौकशी करत आहे. या अमोनियम नायट्रेटमुळेच हा मोठा स्फोट झाला असावा असा संशय आहे.
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाशी जम्मू आणि काश्मीरचा संबंध उघड झाल्यानंतर, तेथे अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांची नौगाम पोलीस स्टेशनच्या आवारात चौकशी सुरू होती. यादरम्यान, शुक्रवारी रात्री (14 नोव्हेंबर) उशिरा झालेल्या स्फोटात अनेक पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. तपासणीसाठी परिसरात आणलेल्या अमोनियम नायट्रेटमुळेच हा स्फोट झाला.
पोलीस पथके जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेट इत्यादींचे नमुने घेत असताना, नौगाम पोलिस ठाण्यात अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. स्फोट झालेल्या अमोनियम नायट्रेटचा साठा हा दहशतवादी डॉ. मुजम्मिल गनईच्या घरातून जप्त केला होता. दरम्यान, नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेला स्फोट हा दिल्लीत झालेल्या स्फोटापेक्षाही मोठा असल्याचं बोललं जातंय.