राजकीय : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला मोठं यश, सुरुवातीच्या कलामध्ये बहुमत
राजकीय : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला मोठं यश, सुरुवातीच्या कलामध्ये बहुमत
img
Dipali Ghadwaje

जम्मू -काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सध्या मतमोजणी सुरू असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजप या ३ पक्षामध्ये जोरदार टक्कर झाली. या तिन्ही पक्षांपैकी कोण बाजी मारते याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालाचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत. १० वाजेपर्यंत हाती आलेल्या कालानुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी ४६ भाजप २३, पीडीपी ३ आणि इतर १४ जागांवर आघाडीवर आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीवर असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मात्र सुरुवातीला आलेल्या कलानुसार नॅशनल कॉन्फरन्स आघाडी आणि भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्व ९० जागांवरचे जे कल आले आहेत आणि काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने आघाडी घेतली आहे. परंतु भाजपला चुरशीची लढत दिली जात आहे.

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ४६ जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजप २३ जागांवर आघाडीवर आहे. पीडीपी ३ जागांवर तर इतर १४ जागांवर आघाडीवर आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटेकी टक्कर सुरू असून भाजपने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला मोठी आघाडी मिळवण्यापासून रोखले आहे.

पहिल्या अर्ध्या तासांत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स २८ जागांवर आघाडीवर होते आता काँग्रेसची आघाडीवरील जागांमध्ये वाढ होत आहे. तर भाजपचा देखील हळूहळू आकडा वाढत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group