वरळी अपघातातील आरोपी मिहीर शाहला मोठा झटका, काय होणार कारवाई ? वाचा सविस्तर
वरळी अपघातातील आरोपी मिहीर शाहला मोठा झटका, काय होणार कारवाई ? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
मुंबईच्या वरळीत रविवारी पहाटे एक महिला तिच्या पतीसोबत प्रवास करत असलेल्या दुचाकीला बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला . मुंबईतील हे हिट अँड रन प्रकरण सध्या भलतंच गाजत असून या अपघातास जबाबदार असलेला मुख्य आरोपी मिहीर शाह याला अपघातानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी अटक केली.

महिलेला चिरडून ठार केल्यानतंर फरार झालेला मिहीर हा मित्रांसह व आई-बहि‍णींसह लपून बसला होता. एका महिलेच्या नाहक झालेल्या मृत्यूमुळे वातावरण चांगलचं तापलं होतं. अखेर दोन दिवस अथक तपास केल्यानंतर पोलिसांनी मिहीरला त्याच्या मित्रांसह अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

वाहन परवाना होणार रद्द

दरम्यान या घटनेप्रकरणी नवे अपडेट्स समोर आले आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचा आता वाहन परवाना रद्द होणार आहे. मिहीरचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलीस पाठपुरावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मिहीर राजेश शहा याच्याविरुद्ध वरळी पोलीस कडक कारवाई करत आहेत. रविवारी पहाटे दारुच्या नशेत गाडी चालवत असलेल्या मिहीरने ॲक्टिव्हाला धडक दिली, परिणामी कावेरी नाखवा यांचा गाडीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे आता वरळी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पत्र लिहून मिहिर शाहचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची विनंती करण्याचा विचार केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा हा लायसन्स मूळत: पालघर आरटीओने जारी केला होता, तेव्हा मिहीर १९ वर्षांचा होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात लक्षणीय प्रगती झाली आहे. दरम्यान मद्यपानाच्या सत्रादरम्यान उपस्थित मिहीरचे मित्र, जुहू बिअर बारमधील कर्मचारी आणि मालाडमधील दुकान मालक ज्यांच्याकडून मिहीरने दारू खरेदी केली होती अशा १३ जणांचे जबाब पोलिसांनी आत्तापर्यंत नोंदवले आहेत
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group