मान्सूनमध्ये धबधब्यात भिजायला जाताय तर सावधान, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO
मान्सूनमध्ये धबधब्यात भिजायला जाताय तर सावधान, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात नुकत्याच दोन दुर्घटना घडल्या. पहिल्या दुर्घटनेत रविवारी लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. तर, आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणानं धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला.

त्यानंतर आता अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. सापाचं नाव ऐकूनच धडकी भरते. हाच साप जर एखाद्याच्या पँटमध्ये शिरला, तर काय होईल याचा विचार करा. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,  हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच हादरून जाल.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली काही तरुण मजा-मस्ती करताना दिसत आहेत. काही पर्यटक धबधब्याखाली अंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. 

यावेळी धबधब्यात पोहताना अचानक एका तरुणाच्या पँटीत साप शिरतो. पाण्यात पोहताना पँटीत साप शिरल्याचं कळताच तरुण पाण्याबाहेर आला. त्याच्या मित्रांनी हा साप पाहिला. या तरुणानं पँटीत शिरलेल्या सापाचं डोकं दाबून धरलं. मग पँटीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले. सापाला पाहून त्याच्यासहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते. मात्र, ते मित्राचा जीव वाचण्यासाठी सापाला पँटमधून बाहेर खेचत होते. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या मित्रानं जोर लावून साप पँटीच्या बाहेर खेचला.

पावसाळ्यात अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. त्यामुळे पावसाळ्यात फिरायला गेल्यावर सतर्क राहणं आवश्यक आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group