मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतझाले आहे. शहरातील रस्त्यांवर जलभराव झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाने 8 जुलैसाठी मध्य महाराष्ट्रा तील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईची वाहतूक अनेकठिकाणी ठप्प झाली. तर, मुंबईच्या लोकल सेवेळेला चांगलाच फटका बसला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणा हायअलर्टवर असल्याचे सांगत गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना केले आहेत. लवकरच सर्व वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईतील अनेक सेवा बंद पडल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रशासनावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालिकेच्या कंट्रोल रुमला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली की, “मुंबईमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” असे ते म्हणाले. तसेच “सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मी करत आहे.” असे आवाहन त्यांनी केले.